Skip Navigation

DVD Ilustrado Multilíngue

The Biology of Prenatal Development




प्रसूतिपूर्व विकासाचे जीवशास्त्र

.मराठ [Marathi]


 

Baixar Versão em PDF  O Que é PDF?
 

O Período Embrionário (As Primeiras 8 Semanas)

Desenvolvimento Embrionário: As Primeiras 4 Semanas

Capítulo 3   Fertilização

जीवशास्त्राच्या दृष्टिकोनातून मनुष्याचा विकास गर्भधानापासून सुक होतो जेंव्हा एक स्त्री व एक पुरुष पुनरूत्पादक पेशींच्या संयोगातुन आपल्या २३ गुणसुत्रांचे मिलन करतो.

स्त्रीच्या पुनरुत्पादक पेशींन्या सामान्यतः अंडे म्हणतात परंतु योग्य शब्द जनकाणु आहे.

त्याचप्रमाणे पुरुषाच्या पुनरुत्पादक पेशींना सर्वत्र "विर्य" म्हणतात जाते परंतु अधिक उचित शब्द शुक्राणु आहे.

स्त्रीच्या अंडकोषातून जनकाणु सोडण्याच्या डिम्बोत्सर्ग नावाच्या प्रक्रीयेनंतर गर्भाशयाच्या फॉलोपिअन टयूब नावाच्या नलिकेत शुक्राणु व जनकाणु एकत्र होतात ज्यांना सामान्यतः म्हणतात.

गर्भाशयाच्या नलिका स्त्रीच्या अंडकोषाला तीच्या गर्भाशयाशी जोडतात

निष्पादित एकपेशीय गर्भास बीजांड म्हणतात याचाअर्थ ''संयुक्त वा एक साथ जोडलेले'' असा होतो.

Capítulo 4   DNA, divisão celular e Fator Inicial da Gravidez (EPF)

बीजांडाचे ४६ गुणसुत्र नवजाताच्या पूर्ण अनुवांशिक नकाशाच्या अद्वितीय प्रथम संस्करणाचे प्रतिनिधित्व करतात. ही श्रेष्ठ योजना डि.एन.ए. नावाच्या घट्ट वक्र परमाणुत असते. त्यांच्यात संपूर्ण शरीराच्या विकासाच्या सुचना असतात.

डि.एन.ए. परमाणु पिळदार शिडीप्रमाणे असतात ज्यांना डबल हेलिक्स म्हटले जाते. शिडीचे दांडे संयुक्त परमाणुंनी बनलेले असतात ज्यांना गुनाइन सायटोसीन, अडेनीन आणि थायमाइन म्हणतात.

गुनाइन फक्त सायटोसीन बरोबर आणि अडेनीन थायमाइन बरोबर संयुक्तहोते. प्रत्येक मानवीपेशीत ठोबळमानाने अशा ३० अरब मूल जोड्यां असतात.

एका पेशीच्या डि.एन.ए. मधे भरपूर माहिती असते केवल प्रत्येक मूल तत्वाचे प्रथम अक्षराची सूची करत जर ती छापील शब्दात लिहिली तर पुस्तकाच्या १५ लाख पानांची गरज पडेल !

जर एका टोकापासून दुसया टोकापर्यन्त मांडली तर एका मानवी पेशीतील डि.एन.ए. ची लांबी ३ १/३ फूट किंवा १ मिटर असते.

जर आपण प्रौढ़ व्यक्तिच्या १०० खरब पेशीतील सर्व डि.एन.ए. उलगडू शकलो तर ते ६३ अरब मैल लांब पसरेल. ही लांबी पृथ्वीपासून सूर्यापर्यन्त आणि परतीच्या एकूण अंतराच्या ३४० पट आहे.

ढोबळ मानाने गर्भधानानंतर २४ ते ३० तासांनंतर बिजांडातील प्रथम पेशी विभाजन पूर्ण होते. मायटोसीनच्या प्रक्रियेद्वारा एक पेशी दोन पेशीत आणि या प्रमाणे दोन पेशी चारपेशीत विभाजित होतात.

गर्भधानानंतर २४ ते ४८ तासांनी आईच्या रक्तात ''प्रारंभिक गर्भावस्थेचे घटक'' असलेलया हारमोनच्या उपस्थिती द्वारा गर्भावस्थेचे निदान करता येते.

Capítulo 5   Estágios Iniciais (Mórula e Blastocisto) e Células Tronco

गर्भधानानंतर ३ ते ४ दिवसात गर्भाच्या विभाजित पेशी वर्तुळाकार धारण करतात आणि मग गर्भाला मोरुला (भ्रुण) म्हणतात.

४ ते ५ दिवसात या पेशींच्या गोळयात एक पोकळी निर्माण होते आणि यानंतर गर्भास वलास्टोसीस्ट म्हणतात.

क्लास्टोसीस्ट मधील पेशींना अंतस्थ पेशी द्रव्य म्हटले जाते ज्या पासून मस्तक, धड़ व विकसनशील मानवाकरिता महत्वाचे अन्य अवयव निर्माण होतात.

अंतस्थ पेशी द्रव्यामधील पेशींना गर्भीय स्टेम पेशी म्हटले जाते कारण मानवी देहात असणार्या २०० पेक्षा जास्त प्रकारच्या पेशी निर्माण करण्याची त्यांच्यात क्षमता असते.

Capítulo 6   1 a 1½ Semanas: Implantação e Gonadotrofina Coriônica Humana (hCG)

गर्भाशयाच्या नलिकांत सरकल्यानंतर प्रारंभिक गर्भ आईच्या गर्भाशयाच्या आतील बाजुवर स्वतः स्थापित होतो. ही गर्भारोपण प्रक्रिया ६ दिवसात शुरू होते आणि गर्भाधानानंतर १० ते १२ दिवसांत पूर्ण होते.

वाढत्या गर्भाच्या पेशी सुमन कोरीओनीक गोन्डोट्रोपिन नावाच्या हरमोनची अथवा बहुतेक गर्भावस्था परिक्षणात आढळणारा पदार्थ एचसीजी निर्मिती करण्यास सुरवात करतात.

गर्भावस्था जारी राखण्याकरीता आईच्या हारमोनसना एचसीजी सामान्य मासिक पाळी थांबवण्या साठी प्रेरित करते.

Capítulo 7   A Placenta e o Cordão Umbilical

गर्भारोपणानंतर ब्लास्टोसीस्टच्या परिधाच्या पेशी नाळेच्या निर्मितीस प्रारंभ करतात जी आईच्या आणि गर्भाच्या रक्ताभिसरण संस्थे मधे मध्यस्थ म्हणून कार्य करते.

नाळ मातृक प्राणवायु, पोषकतत्वे अंतर्स्त्राव आणि औषधी वाढत्या गर्भाला पोहचविते, सर्व मलमूत्र दूर करते आणि आईच्या रक्ताला भ्रुण व गर्भाच्या रक्तात मिसळण्यापासून रोखते.

नाल हारमोनस सुद्धा निर्माण करते आणि भ्रुण व गर्भाचे शारीरिक तापमान आईच्या शारीरिक तापमानापेक्षा किंचित जास्त राखते.

नाळ विकसनशील गर्भाशी गर्भनलीके द्वारा संपर्क राखते.

नाळेच्या जीवन संरक्षक क्षमता आधुनिक हॉस्पीटलमधील सघन चिकित्सा कक्षाच्या क्षमतेशी प्रतिस्पर्धा करतात.

Capítulo 8   Nutrição e Proteção

एक आठवडयानंतर, अंतस्थ पेशी पिंडाच्या पेशी हाईपोब्लास्ट आणि एपीब्लास्ट नावांचे दोन आवरण-स्तर निर्माण करतात.

हाईपोब्लास्ट चर्बीयुक्त आवरण निर्माण करतो आई प्रारंभिक गर्भाला पोषकतत्वांच्या पुरवठा ज्या संरचनाद्वारा करते त्यापैकी ते एक आहे.

एपीब्लास्टच्या पेशी अम्नीऑन नावाचे गर्भावरण निर्माण करतात, ज्यामधे भ्रुण व नंतर गर्भस्थ शिशु जन्मापर्यंत वाढतात.

Capítulo 9   2 a 4 Semanas: Camadas Germinativas e Formação de Órgãos

ढोबळमानाने 2 1/2 आठवड्यापर्यन्त एपीब्लास्ट तीन विशेष पेशी-आवरण, निर्माण करतो ज्यास एक्टोडर्म, एंडोडर्म, आणि मेसोडर्म म्हणतात.

एक्टोडर्मपासून अगणित संरचना निर्माण होतात ज्यात मेंदू, मज्जारज्जु, मज्जातंतु, त्वचा, नखे, आणि केसांचा समावेश आहे.

एन्डोडर्म श्वसनसंस्थेच्या आतील मृदू त्वचा पचनसंस्थेचा मार्ग आणि यकृत व स्वादुपिंडासारख्या प्रमुख अवयवांच्या संरचनांची निर्मीती करते

मेसोडर्म हृदयाची किडनी हाडे, मृदूअस्थि स्नायु रक्तपेशी आणि अन्य संरचनांची निर्मिती करते.

तीन आठवडयानंतर मेन्दू तीन प्राथमिक हिश्शयात विभाजित होतो ज्यांना अग्रमेंदू मध्यमेन्दू आणि मागीलमेन्दू म्हणतात.

श्वसन आणि पचनसंस्थेचा विकास सुरू असतो.

प्रथम रक्तपेशी चर्बीयुक्त आवरणत प्रकट होतात गर्भाच्या संपूर्ण शरीरात रक्तवाहिन्या स्थापित होतात आणि जवळजवळ लगेचच.

नलिकेच्या आकाराचे हृदय उभरते भराभर वाढणारे हृदय आंत मुडपते आणि त्यांत स्वतंत्र कप्पे विकसीत होण्यास सुरवात होते.

फलिती करणाचे पाठोपाठ तीन आठवडे आणि एक दिवसानंतर हृदयाचे स्पंदन होण्यास सुरवात होते.

रक्ताभिसरण संस्था क्रियाशील होणारी प्रथम शारीरिक संस्था किंवा संबंधित अवयवांचा समूच्चय आहे.

Capítulo 10   3 a 4 Semanas: O Dobramento do Embrião

तीन ते चार आठवडयांचे मधे शरीराची रचना सुस्पष्ट होते कारण, मेंदू, मज्जारज्जू, आणि चर्बीच्या आवरणांच्या बाजूला गर्भाचे हृदय सहजपजे ओळखू येते.

गतीमान विकासामुळे सापेक्षतः सपाट गर्भ गोलाकार होतो. ह्या प्रक्रियेत चर्बीच्या पिशवीचा हिस्सा पाचनसंस्थेच्या अंतस्थ आवरणांत रूपांतरीत होतो आणि वाढणाया गर्भाची छाती व पोटातील पोकळी तयार होते.