| |
Capítulo 1 Introdução
|
| |
| एकपेशीय मानवी बिजांड ज्या
गतिमान प्रक्रियेद्वारा
100 खरबपेशींचे विकसीत शरीर
होते ही कदाचित
निसर्गाची सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण
प्रक्रिया आहे.
|
| संशोधकांना आता माहित आहे की
पूर्ण विकसीत शरीराद्वारा
केल्या जाणाया नित्याच्या अनेक क्रिया
बहुतेक वेळा जन्माच्या खूप आधी,
गर्भावस्थेच्या दरम्यान स्थापित होतात.
|
| जन्मपूर्व विकासाचा कालावधी
पूर्वतयारीया काळ मानला जातो
ज्याचे दरम्यान विकसनशील मनुष्य
जन्मानंतरच्या अस्तित्वाकरीता
अनेक संस्था प्राप्त करतो
आणि आवश्यक कौशल्यांचा सराव करतो.
|
Capítulo 2 Terminologia
|
| गर्भधानापासून अथवा
लैंगीक संबंधा पासून
मोजली असता जन्मापर्यन्त
मनुष्याची गर्भावस्था ढोबळमानाने
३८ आठवडयाची असते.
|
| गर्भधानानंतरच्या प्रथम
८ आठवडयाचे दरम्यान
विकसनशील मानवी शरीरास
भ्रुण म्हणतात
ज्याचा अर्थ 'आंत वाढणारा' असा होतो.
भ्रुण अवस्थेचा काल म्हटला जाणार्या
ह्या, कालावधीत शरीरातील अधिकतर
मुख्य संस्था निर्माण होतात.
|
| ८ आठवडयांच्या पूर्तीपासून
गर्भावस्थेच्या शेवटापर्यन्त
विकसनशील मानवी शरीरास
गर्भस्थ शिशु म्हणतात
ज्याचा अर्थ न जन्मलेले तान्हुले
असा आहे.
गर्भावस्थेच्या या कालवधीत,
शरीर विकसीत होते आणि त्यातील संस्था
काम करण्यास सुरवात करतात.
|
| सर्व गर्भावस्थीय व भ्रुणाच्या अवस्थांचे
वर्णन या कार्यक्रमात
गर्भधानानंतरच्या कालावधीच्या
संदर्भात केले आहे.
|