Skip Navigation

DVD Ilustrado Multilíngue

The Biology of Prenatal Development




प्रसूतिपूर्व विकासाचे जीवशास्त्र

.मराठ [Marathi]


 

Baixar Versão em PDF  O Que é PDF?
 

Capítulo 40   3 a 4 Meses (12 a 16 Semanas): Papilas Gustativas, Movimento de Mandíbula, Reflexo de Sucção, Percepção dos Primeiros Movimentos do Feto

11 व 12 आठवडयाचे दरम्यान गर्भाचे वजन 60 प्रतिशत वाढते.

बारा आठवडयानंतर प्रथम तिमाहीचा किंवा गर्भावस्थेच्या तिमाहीचा काल पूर्ण होतो.

तोंडाच्या आतील बाजूवर स्वाद-बिंदु प्रकट होतात.
जन्मानंतर, स्वाद-बिंदु फक्त जीभ व तोंडाच्या टाळूवर राहतील.

12 आठवडयाच्या आसपास आतडयाच्या हालचाली सुरू होऊन सुमारे सहा आठवडे सुरू राहतात.

गर्भाच्या व नवजाताच्या आतडयानी प्रथम बाहेर फेकलेल्या पदार्थास मेकोनिअम म्हणतात. ते पाचक स्त्राव, प्रथिने आणि पचनसंस्थेच्या मार्गाने टाकलेल्या मृत पेशींच बनलेले आहे.

बारा आठवडया नंतर हातांची लांबी शरीराच्या आकाराच्या अंतिम अनुपाता एवढी झालेली असते. पायांना त्यांच्या अंतिम आकाराएवढे होण्यास जास्त वेळ लागतो.

पाठीचा व शिर्षस्थ भागाचा अपवाद वगळता गर्भाचे संपूर्ण शरीर आता हलक्याशा स्पर्शाला प्रतीसाद देते.

लैंगीकता आधारित विकासात्मक फरक पहिल्यांदाच प्रकट होतात. उदाहरणार्थ स्त्री-गर्भ पुरुष-गर्भापेक्षा खूप जास्त वेळा जबडयाच्या हालचाली करतो.

या आधी आढळलेल्या मागे जाण्याच्या प्रतिसादाचे ऐवजी तोंडाजवळील उद्दीपन आता उद्दीपकाचे दिशेने वळणे व तोंड उघडणे असा प्रतिसाद निर्माण करते. या प्रतिसादाला रूटिंग प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात ती जन्मानंतर कायम रहाते आणि नवजात शिशुला स्तनापानाच्या दरम्यान त्याच्या आईची स्तनाग्रे शोधण्यास मदत करते.

गाल मासंल होउ लागल्याने चेहरा परिपूर्ण होणे सुरू रहाते आणि दातांची वाढ सुरू होते.

१५ आठवडयानंतर रक्त निर्माण करण्यार्या रक्तपेशी येतात आणि हाडांच्या पोकळीत संवर्धित होतात. सर्वाधिक रक्तपेशींची निर्मिती येथे होवे.

जरी सहा आठवडयाच्या गर्भाच्या हालचाली सुरू होतात गर्भवती स्त्रीला गर्भाच्या हालचाली १४ ते १८ आठवडयाच्या दरम्यान प्रथम जाणवतात. पारंपरिकरित्या हया घटनेस क्विकनिंग म्हणतात